यवतमाळ: साधारणपणे ३५ वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथे पहिली शेतकरी सहकुटुंब आत्महत्या झाली होती . शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी सहकुटुंब आत्महत्या केली होती . तब्बल ३५ वर्षांपासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच आहे . शेतकरी स्मृती दिनाच्या मागणीला जोर धरत आहे . आजच्या दिवशी संपूर्ण राज्यात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाची हाक देण्यात आली आहे . त्या अनुषंगाने जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे आज शेतकरी पुत्रांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले आहे . या आंदोलनाला सामान्य नागरिकांनीही जगाच्या पोशिंद्यासाठी एक दिवस अन्नत्याग करून आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहे .
#FarmerSuicide #Sahebraokarpe #Yavatmal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.